About Author

माझे नाव साजन भुवड आहे आणि मी मूळचा महाराष्ट्रातील Dapoli येथील आहे. Finance आणि Investing या क्षेत्रातील माझा प्रवास विद्यार्थीदशेपासूनच सुरू झाला.

लहानपणापासूनच मला वाचनाची विशेष आवड होती. Junior College मध्ये Commerce शाखा निवडल्यानंतर Finance क्षेत्राबद्दलची उत्सुकता अधिक वाढली. त्यानंतर मुंबईतील Patkar-Varde College मध्ये शिक्षण घेत असताना Mutual Fund हा विषय अभ्यासक्रमाचा भाग होता आणि तिथूनच Personal Finance, Stock Market आणि Investing बद्दल माझी गंभीर आवड निर्माण झाली.

या प्रवासात मी अनेक पुस्तके वाचली, पण The Psychology of Money या पुस्तकाने माझ्या विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकला. आर्थिक ज्ञान सोप्या भाषेत आणि विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ही प्रेरणा मला याच पुस्तकातून मिळाली.

जून 2021 मध्ये मी Marathi Finance ची सुरुवात Instagram Page म्हणून केली. आज Marathi Finance हा Instagram, Threads आणि Facebook वर मिळून 27,000+ पेक्षा अधिक लोकांचा विश्वास संपादन करणारा एक मजबूत Financial Community बनला आहे.

व्यावसायिक अनुभव

मी Saraswat Co-operative Bank मध्ये सुमारे 4.5 वर्षे Banker म्हणून काम केले आहे. सध्या मी ICICI Prudential Mutual Fund येथे Relationship Manager म्हणून कार्यरत आहे.

Banking आणि Mutual Fund क्षेत्रातील अनुभवामुळे मला सामान्य गुंतवणूकदारांच्या अडचणी, शंका आणि गरजा जवळून समजल्या. त्यामुळे आर्थिक विषय सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न करतो.

Certifications

मी Financial Market आणि Mutual Fund क्षेत्रातील विविध National Institute of Securities Markets (NISM) Certifications पूर्ण केले आहेत:

  • NISM Series V-A: Mutual Fund Distributor Certification
  • NISM Series V-B: Mutual Fund Foundation Certification
  • NISM Series XXI-A: Portfolio Management Services (PMS) Distributor Certification
  • Mutual Fund Operations Module by NISM

तसेच मी Securities and Exchange Board of India (SEBI) Investor Certification Exam देखील पूर्ण केलेली आहे.

IPOInMarathi.com ची सुरुवात का केली?

आज IPO आणि Share Market संबंधित माहिती प्रामुख्याने इंग्रजी किंवा हिंदी भाषेत उपलब्ध आहे. मात्र मराठी गुंतवणूकदारांसाठी सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह भाषेत IPO माहिती देणारे प्लॅटफॉर्म अजूनही मर्यादित आहेत.

हीच गरज ओळखून मी IPOInMarathi.com ची सुरुवात केली. या प्लॅटफॉर्मद्वारे Upcoming IPO, IPO Review, GMP Updates, Share Market News आणि Investing संबंधित माहिती मराठीतून देण्याचा प्रयत्न केला जातो.

याशिवाय MutualFundInMarathi.com या ब्लॉगद्वारे मी Mutual Fund, SIP, Personal Finance आणि Wealth Creation संबंधित माहिती देखील शेअर करतो.

माझे ध्येय

माझे ध्येय अतिशय साधे आहे — Finance हा विषय कठीण किंवा भीतीदायक नसून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती तो सहज समजू शकते, हे लोकांना दाखवणे.

मी विशेषतः खालील गोष्टींवर भर देतो:

  • लोकांमध्ये लवकर Investing ची सवय निर्माण करणे
  • क्लिष्ट आर्थिक विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे
  • मराठी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि सक्षम बनवणे
  • Long Term Wealth Creation बद्दल योग्य मार्गदर्शन करणे

Marathi Finance, IPOInMarathi.com आणि MutualFundInMarathi.com या माध्यमातून माझा प्रयत्न आहे की मराठी भाषेत दर्जेदार आणि विश्वासार्ह आर्थिक माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी.

या प्रवासाचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद.

नवीन IPO Updates, Investing Tips आणि Financial Content साठी Marathi Finance ला Instagram वर नक्की Follow करा.